breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,54,389 वर

  • मुंबईत 2,211, पुण्यात 1,237 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या 10 हजार 552 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 54 हजार 389 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 158 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 40 हजार 859 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 19 हजार 517 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 16 हजार 769 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 96 हजार 288 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 2 हजार 211 नवे रुग्ण आढळले, तर 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 34 हजार 606 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 552 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 3 हजार 370 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 01 हजार 497 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1 हजार 237 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 430 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 297 इतका झाला आहे. दरम्यान, बुधवारी आढळलेल्या 1 हजार 237 नव्या रुग्णांपैकी 528 रुग्ण पुणे शहरातील असून 289 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 55 हजार 595 वर पोहोचली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 84 हजार 564 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button