breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी राष्ट्रवादीचे पोलिसांना साकडे

  • उपायुक्त गणेश शिंदे यांना पक्षातर्फे निवेदन

पिंपरी – उद्योगनगरी म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढली आहे. खून, मारामा-या, दरोडे, वाहनांची तोडफोड अशा घटना वारंवार घडत आहेत. छेडछाड, अत्याचार वाढल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ही गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

 

वाघेरे यांनी यासंदर्भात पिंपरी-चिंचवड परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना पक्षातर्फे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहराच्या सर्वच भागांमध्ये सध्या वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे. महागड्या गाड्या समाजकंटकांकडून फोडल्या जात आहेत. बॅंक लोन करून घेतलेल्या महागड्या गाड्या फोडल्या जात असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांची छेडछाड केली जात आहे. भरदिवसा महिलांच्या सोनसाखळी हिसकावल्या जात आहेत.

 

विशेषतः शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अत्याचार, कौटुंबिक छळ, आत्महत्या केल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ही गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, संदिपान झोंबाडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button