breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना माजी शहरप्रमुखाची गोळ्या झाडून हात्या, आरोपी फरार

पिंपरी / महाईन्यूज

शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे घडली आहे.

राहुल उमेश शेट्टी असे खून झालेल्या शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. शेट्टी खून प्रकरणी अज्ञात आरोपी हे फरार आहेत. राहुल शेट्टी हे घराजवळील हॉटेलमध्ये चहा पीत बसले असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गोळ्या झाडून खून करण्यात आलेल्या राहुल उमेश शेट्टी यांचे शहरातील अनेक जणांशी पटत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज लोणावळा पोलिसांनी वर्तविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button