breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जेलमधून बाहेर आल्यावर बघून घेतो, मी दादा आहे इथला; कासारवाडीत पोलिसाला धमकी

पिंपरी / महाईन्यूज

रविवारी दुपारी नाशिक फाटा येथे वाहतूक नियोजन सुरु असताना नाशिक फाट्याकडून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावरून तरुण दुचाकीवरून (एमएच १२, एफजे ६३७०) विरुद्ध दिशेने आला. वाहतूक पोलीस नागरे यांनी त्याला अडविले. पोलीस हवालदार नागरे यांच्याशी हुज्जत घालत तरुणाने बघून घेण्याची धमकी दिली.

‘मी तुमच्या सारख्या पोलिसांना कोलतो. तू कोण मला अडवणारा व विचारणारा. मी इथला दादा आहे. माझे कोणीही काहीही वाकडे करु शकणार नाही. तुला काय तक्रार द्यायची ती दे. मी दोन दिवसात जेलमधुन बाहेर येईन, पण बाहेर आल्यावर तुझी गेम करुन टाकीन.’ अशी धमकी आरोपीने पोलीस हवालदार नागरे यांना दिली. ही घटना जेआरडी टाटा उड्डाणपुल, नाशिक फाटा येथे रविवारी (दि. २६) दुपारी पाच वाजता घडली.

गणेश संभाजी चव्हाण (वय २८, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विष्णू तुकाराम नागरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालून वाहतूक पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button