breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Lockdown : चिंचवडमध्ये काही व्यक्तींचा शिरकाव, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रदुर्भाव रोजच्या रोज वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेजारी कोणी नवीन पाहुणा आला तरी, नागरिकांच्या खासगीत कुरबुरी सुरू होतात. असाच काहीसा प्रकार चिंचवडगावातील चिंचवडेनगर परिसरात आज शनिवारी पहावयास मिळाला.

चिंचवडेनगरमधील जय गणेश कॉलनीत एका परप्रांतीय व्यक्तीचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. या दुकानदाराच्या घरी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर परिसरातील व्यक्तीने काही इसम राहण्यास आले असताना पहिले. त्या नंतर दुसऱ्या दिवशी जय गणेश कॉलनीतील नागरिकांना याची कुणकुण लागली. माणिक कॉलनी परिसरातील घटना ताजी असताना, या घटनेचे गांभीर्य ओळखून लोकांनी याबाबत त्या दुकानदाराकडे अधिकृत खुलासा मागितला. त्या दुकानदाराच्या पुण्यातील मेव्हण्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीला तालेरा येथील रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल केले आहे. त्यामुळे तो मेव्हणाच फक्त आमच्याकडे रहायला आहे. या व्यतिरिक कोणतेही इसम आमच्याकडे येत नसल्याचे त्या दुकानदाराने सांगितले.

नागरिकांना मात्र, भलताच संशय आल्याने नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या दुकानदाराचे भाजीपाल्याचे दुकान बंद करून, त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस चौकीला नेले आहे.

दरम्यान अशा घटनेवरून कोरोनाबाबत लोकांची जागृती व तत्परता किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याची जाणीव होते. मुळात नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन योग्यरित्या केले तर, नागरिकांना कोरोनाचे भय बाळगण्याचे काहीच कारण नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button