breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पिंपरीत अमृता फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे नाव असले म्हणजे कोणी ठाकरे होत नाही, असे वक्तव्य केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मिसेस फडणवीस यांना जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

सत्ता गेल्याने निराशेपोटी केविलवाणी टिका करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या फोटोस जोडे मारून आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यापुढे टीका केल्यास घरात घुसून शिवसेना महिला आघाडी समाचार घेईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या पतीचेही न ऐकणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर राहील, असा इशारा देण्यात आला.

आंदोलनात नगरसेविका मीनल यादव, चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, उपशहर संघटिका शशिकला उभे, आशा भालेकर, मराठी युवती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले, नंदा दातकर, जनाबाई गोरे, वर्षा भालेराव, कामिनी मिश्रा, भारती चकवे, भाग्यश्री मस्के, चिंचवड विधानसभा प्रमुख शर्वरी जळमलकर, नजमा शेख, स्मिता मोगरे, निर्मला पाटील, कविता बॅनर्जी आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

तसेच, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेना जिल्हाप्रमुख सुरेश लांडगे, सचिन सानप, कुणाल जगनाडे, पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधू, अमित शिंदे, नितीन बोंडे, चंद्रकांत जाधव, प्रवीण पाटील, प्रकाश जाधव, विभाग प्रमुख निलेश हाके, किशोर शिंदे व शहर समन्वयक सर्जेराव भोसले यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनात हजर होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button