breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दालख करण्याची मागणी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

आर.रिपब्लिक टीव्हीचे अर्नब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टिका केली. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताकडे केली आहे.

 रिपब्लिक भारत टीव्हीवर २१ एप्रिलला दाखवलेल्या शोमध्ये दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल असे जाणीवपूर्वक भाष्य गोस्वामी यांनी केले. १७ एप्रिलच्या पालघर येथील झुंडबळीच्या घटनेबद्दल त्यांचे विधान चुकीचे व आक्रमक होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरुद्धही अपशब्द वापरून समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न गोस्वामी यांनी केला.

एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दलही अपशब्द वापरले. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे गोस्वामी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button