शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना व शिवशाही व्यापारी संघ यांच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पिंपरी कॅम्प शगून चौक येथे शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश सचिव गणेश आहेर व शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या शुभ हस्ते बाळासाहेबांच्या प्रतीमेस पुष्प अर्पण केले. शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिका सुलभा उभाळे यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले .
यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, माऊली जाधव, दत्ता गिरी, गणेश पाडूळे, निलेश भोरे, सागर शिंदे, दिपक कांबळे, महेश गूळगोंडा, अमित आहेर, दत्ता क्षिरसागर यांच्यासह शिवसेना शहरप्रमूख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, हरेश नखाते आधी उपस्थित होते.