breaking-newsपिंपरी / चिंचवड

मालमत्ता करातून पालिकेच्या तिजोरीत 250 कोटीचा जमा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे सहा महिन्यात मालमत्ता करातून 250.94 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आजअखेर 2 लाख 21 हजार 925 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला तर 1 लाख 14 हजार 635 मिळकत धारकांनी 126.82 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे आणि ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे. ऑनलाईन कराचा भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दिवसें-दिवस ऑनलाईन कर भरणा-यांची संख्या वाढत आहे. 17 सप्टेंबर 2018 अखेर एक लाख 14 हजार 635 मिळकत धारकांनी 126.82 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. तर, 81 हजार 957 मिळकतधारकांनी 45.50 कोटी रुपयांचा भरणा रोख स्वरुपात केला असून  24 हजार 555 मिळकतधारकांनी 65.80 कोटी रुपयांचा धनादेशाद्वारे भरणा केला आहे. ऑनलाईनद्वारे भरणा झालेली मिळकत कराची रक्कम ही एकूण मिळकत कर रक्कमेच्या 50.57% इतकी आहे, असे गावडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button