breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: सुट्टीच्या तीनही दिवशी सर्व कर संकलन कार्यालये रात्री नऊपर्यंत राहणार सुरू!

तीन दिवसांत 90 काेटींचे आव्हान: 1 हजार काेटींचे उदिष्ट साध्य करण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरावा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. उद्या (शुक्रवार)पासून महापालिकेला तीन दिवस सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवसात सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना कर भरता यावा, यासाठी कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच सध्या महापालिका तिजाेरीत 910 काेटींचा महसूल जमा झाला असताना शेवटच्या तीन दिवसात 90 काेटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 910 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. 1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे,  यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळेच सातत्याने कराचा भरणा वाढला आहे.

नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. उद्या शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवार महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कॅश काऊंटरवर मालमत्ता कराचा भरणा स्विकारला जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

… असा आला रूपया

ऑनलाईन – 513 कोटी 58 लाख
रोख.       – 131 कोटी 24 लाख
धनादेशाद्वारे – 147 कोटी 17 लाख
इडीसी- 12 कोटी  93 लाख
आरटीजीएस -43 कोटी 20 लाख
डीडी – 8 काेटी 12 लाख
विविध ॲप – 6 कोटी 93 लाख
इनइफ्टी – 6 काेटी 83 लाख

कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी

औद्योगिक – 4 हजार 395
निवासी- 4 लाख 26, 530
बिगरनिवासी – 44 हजार 554
मिश्र- 12 हजार 432
मोकळ्या जमिन 4 हजार 416
इतर – 5
एकूण 4 लाख 92 हजार 422

वाकड झोनमध्ये सर्वाधिक कर भरणा-यांची संख्या

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 65 हजार मालमत्ता धारकांनी 148 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवी, चिखली, चिंचवड, माेशी, भोसरी झोनमध्ये कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 8 हजार 96 मालमत्ता धारकांनी 23 कोटी 38 लाखांचा कर भरणा केला आहे.

गेल्या अनेक वर्षातील आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे तब्बल 76 काेटींची पाणीपट्टीची वसुली झाली आहे. मात्र, त्यानंतरही पाणीपट्टी माेठ्या प्रमाणात थकीत आहे. तसेच आगामी आर्थिक वर्षातही मिळकत कर आणि पाणीपट्टी थकीत असणा-यांचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे ही निरंतर कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी 31 मार्चपूर्वी पाणीपट्टी, मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
-प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त.

शहरातील निवासी मालमत्ता धारकांकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मात्र, ज्या थकबाकीदारांची आर्थिक क्षमता नाही, त्यांनी टप्या-टप्याने जेवढा शक्य आहे तेवढा कर भरावा. जेणेकरून विलंब शुल्काची रक्कम दिवसेंदिवस वाढणारी कमी हाेईल. कर थकीत ठेवणे हे नागरिकांच्या दृष्टीने आर्थिक हिताचे नाही. थकीत कर भरणे हे नागरिकांच्याच फायद्याचे आहे.
– नीलेश देशमुख,
सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button