breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शास्ती कराचे ‘पाप’; भाजप-शिवसेना जबाबदार – मारुती भापकर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या शास्तीकराच्या पापात भाजप, शिवसेनाही तितकीच वाटेकरी, जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी भाजप पक्षनेते एकनाथ पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना केला आहे. शास्ती कराच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादात आता शिवसेनेलाही ओढले गेल्याने राजकीय वतावरण चांगलेच तापणार आहे.

यासंदर्भात भापकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे तत्त्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनियमित बांधकामे व शास्तीकराबाबत आपल्या आंदोलनाची वेळोवेळी दखल घेतली. नियमीतीकरणाचा कायदा बनविण्यासाठी उपसंचालक नगररचना महाराष्ट्र राज्य, नामदार बाळासाहेब थोरात, स्वाधीन क्षेत्रीय व शेवटी सिताराम कुंटे समिती नेमुन कुंटे समितीचा अहवाल २०१४ ला सादर झालेला असताना २ वर्षे हा अहवाल भाजपा सरकारने दडपून ठेवला. आघाडी सरकारच्या काळात आपल्या आंदोलनाची दखल घेत होते. शहरात आले तर आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन निवेदन स्वीकारुन लोकशाही संकेत पाळत होते. मात्र, भाजपा सरकार हुकूमशाही पद्धतीने वागवत लोकशाही संकेत पायदळी तुडवत पोलीसांच्या माध्यामांतून आंदोलनच चिरडून टाकत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफी बाबत मागील चार वर्षात ३ वेळा शहरात येऊन अभिवचने दिली. एवढेच नव्हे तर चापेकर वाड्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात शास्तीकर शुल्क आकारण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात येत आहेत, शास्तीकराचा मुद्दा महत्वाचा आहे. नियमितीकरणाचे शुल्क किती घ्यायचे ? याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत. असे जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी म्हटले होते. असे त्यांनी म्हटलेले असताना आपण शास्तीकर वसूलीची अमंलबजावणी सुरु केली. या ९ जानेवारीला मुख्यमंत्री विविध प्रकल्प व पोलीस आयुक्त कार्यालयाच्य उद्घघाटनाला शहरात आले होते. त्यावेळी पिंपरी चिंचवडकरांची शास्तीची धास्ती पुढील १५ दिवसात घालवून टाकू, असे पुन्हा एकदा अभिवचन दिले. त्यांनी ते पाळावे. शास्ती कराच्या पापात भाजपबरोबर शिवसेनाही तितकीच जबाबदार असल्याचे भापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button