breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शंभर टक्के शास्तीकर’ माफीवरुन भाजपचा युटर्न ; ‘शास्ती’चा फायदा छोट्या बिल्डरांना

आमदारांच्या बगलबच्चांसाठी 600 स्वेअर फुटांचा शास्ती माफीचा निर्णय – दत्ताकाका साने

पिंपरी ( महा ई न्यूज ) – अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर शंभर टक्के सोडविण्याचे आश्वासन प्रत्येकवेळी पिंपरी-चिंचवडकरांना मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतू, शंभर टक्के शास्तीकरांचा प्रश्न न सोडविता 600 स्वेअर फुटापर्यंत निर्णय घेण्यात आला. पंरतू, या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला फायदा झालेला नाही. उलट भाजप आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या बगलबच्चे असणा-या बिल्डर लाॅबीला अधिक फायदा झाला, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकाराशी बोलताना केला. 

चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि. 9 जानेवारी) पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीचा प्रश्न 15 दिवसात सोडवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व पक्षीय विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे ‘काऊंट डाऊन’ सुरु केले आहे. यावर ‘शास्तीकर हे विरोधकांचेच पाप असून ते धुण्याचे काम आम्ही करत आहोत’, अशी टीका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली होती. त्याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज (बुधवारी) प्रत्युत्तर दिले.

साने म्हणाले, ” मागील प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी अवैध बांधकामाचा शास्तीकर 100 टक्के माफीचे गाजर पिंपरी-चिंचवडकरांना दाखविले. प्रत्यक्षात राज्यासह महापालिकेवर भाजपची सत्ता येवूनही चार वर्षात शास्तीकर माफीवरुन जनतेची घोर फसवणूक केली आहे. शहरात आल्यानंतर तीनही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शास्तीकर माफ केल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही आमदारांनी प्रश्न सुटल्याचे सांगत शहरभर फलक लावले, पेढे वाटले. त्यानंतर पुन्हा आम्हाला शास्तीची धास्ती असल्याचे आमदार मुख्यमंत्र्यासमोर सांगतात, हे शहराचे दुर्भाग्य आहे. तसेच प्रश्न सुटल्याचे सांगत फलक लावून जनतेची दिशाभूल कशासाठी केली”? असा सवाल साने यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शहरात करसंकलन विभागाकडून मिळकतधारांना जप्ती पुर्वच्या नोटीसा दिल्या जात आहेत. पालिकेने त्या नोटीस देणे थांबवावे. नागरिकांना 100 टक्के शास्तीकर माफ होत नाही, तोपर्यंत शास्तीकर भरु नये, असे आवाहनही साने यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button