breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शास्तीकरावर सत्ताधा-यांच्या विरोधात दत्ता सानेंनी उपसली ‘तलवार’


पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना आकारला जाणारा शास्ती कर रद्द करण्याची मागणी करूनही पालिका प्रशासनाने पर्यायी सत्ताधा-यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. आता शास्ती कराच्या संदर्भात सत्ताधा-यांचे डोळे उघडण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी रविवारी (दि. 22) बैठकीचे आयोजन केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील हजारो अनधिकृत व वाढीव बांधकामांना पालिकेने मिळकतकरामध्ये शास्तीकर आकारला आहे. याबाबत आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी व नागरिकांनी आंदोलने व निदर्शने केली. सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात देखील शास्तीकरा माफीबाबत निर्णय घेऊ असे, आश्वासन देण्यात आले होते. मात्र, युती सरकारच्या कार्यकाळात इच्छाशक्ती अभावी शास्तीकर माफीचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

शास्तीकराबाबत निव्वळ राजकारणच केले जाते. भाजपच्या पदाधिका-यांनी व शहरातील आमदारांनी शास्तीकर माफ केला अशी नागरिकांची दिशाभूल करून अनेकदा साखर, पेढे वाटून स्वत:ची जाहिरात करून प्रसिद्धी मिळवली. मात्र, शहरातील गोर, गरीब कष्टकरी कामगार मिळकतधारक शास्तीकर माफीच्या लाभापासून वंचित राहिला. या सर्व बाधितांना आता न्यायालयातूनच न्याय देऊ असा निर्धार माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.

यानिमित्त शहरातील सर्व शास्तीकर बाधितांची बैठक रविवारी (दि. 22) दुपारी 4 वाजता आकुर्डीतील खंडोबा माळ मंदिरा शेजारील मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी शास्तीकर बाधित नागरिकांनी मिळकतकर पावती, किंवा मिळकतकर भरण्याबाबतची नोटीस प्रत्येकी दोन प्रती घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन दत्ता साने यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button