breaking-newsआंतरराष्टीय

चीनकडून पाकिस्तानचा अपेक्षाभंग-मदतीबाबत चीनचे मौन

बीजिंग (चीन) – आर्थिक मदतीची मोठी अपेक्षा असलेल्या चीनकडून पाकिस्तानचा अपेक्षाभंग होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चीन दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही चीनकडून पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र दोन्ही देशांच्या प्रमुखांनी भारतासह इतर अनेक विषयांवर चर्चा केली आहे. पंतप्रधान इम्रान खान चीन दौरा आटोपून पाकिस्तानल परत येत नाहीत, तोपर्यंत चीनकडून आर्थिक मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त योग्य नाही, असे पाकिस्तानमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान दोन्ही देशांनी भारत-पकिस्तानमधील बिघडत्या संबंधांबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांचे चीन समर्थन करत असल्याचा त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. चीनने पाकिस्तानला एनएसजी गटाचे सदस्यत्व मिळण्यासाठी, तर पाकिस्तानने चीनच्या सक्रिय सहभागासाठी समर्थन जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानला चीनकडून 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे. चीनकडून मिळणाऱ्या सहा अब्ज डॉलर्स पॅकेजचा हा हिस्सा आहे. इम्रान खान पाकिस्तानला परतण्यापूर्वी चीन आर्थिक मदतीबाबत काही घोषणा करतो का हेच पाहायचे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button