breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

या लहान मुलाची फलंदाजी पाहून विराटही झाला थक्क, म्हणाला…

मुंबई | महाईन्यूज

सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मात्र त्यामुळेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर रोज नवीन नवीन व्हिडिओ, माहिती आणि फोटो पहायला मिळतात. प्रत्येकजण रोज काही ना काही गोष्टी या माध्यमातून शेअर करत असतात. अनेकदा व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील व्यक्ती रातोरात सेलिब्रिटी होते. मात्र आता सोशल नेटवर्किंगवर एका लहान मुलाचा क्रिकेट खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केवीन पीटरसन आणि विराट कोहलीही हा व्हिडिओ पाहून थक्क झालेले आहेत.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ अगदी केवीन पीटरसननेही शेअर करत कोहलीला या मुलाला भारतीय संघात घे असा सल्ला दिला आहे. “काय?????… विराट याला तुझ्या संघामध्ये घे. तू याला संघात घेशील ना?,” या कॅप्शनसहीत पीटरसनने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

विराटनेही पीटरसनच्या या पोस्टची दखल घेत त्याला उत्तर दिले आहे. विराटने या मुलाच्या कौशल्याचे कौतुक केलं आहे. “हा मुलगा आहे कुठला? अशक्य कामगिरी आहे ही,” अशी कमेंट विराटने केली आहे.

दरम्यान, सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील तिसरा सामना निर्णयाक ठरणार असल्याने त्यासाठी भारतीय संघ तयारी जोरात करत आहे. मालिकेमधील पहिला सामना वेस्ट इंडीजने आणि दुसरा भारताने जिंकलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button