breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ध्वजवंदन होणार

पिंपरी | महाईन्यूज |प्रतिनिधी

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय शनिवारी (दि. १५) ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. हा सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून ध्वजवंदन केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाकडून काही नियम निश्चित केले आहेत. ध्वजवंदनाचा कार्यक्रम शाळास्तरावर सकाळी ८.३५ पूर्वी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा स्तरावर संबंधित कार्यक्रमासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शाळेत बोलावण्यात येऊ नये, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कन्टेन्मेंट झोन) शाळा असू नये.

संबंधित कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यासह कमाल ५ व्यक्ती ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय हा कार्यक्रम घेण्याच्या सूचना अंमलात आणाव्यात, असे महापालिका शिक्षण विभागाच्या (प्राथमिक) प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. संबंधित ध्वजवंदन कार्यक्रमास गर्दी होणार नाही, याबाबत आयोजकांनी दक्षता घ्यावी. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व सूचनांचे पालन करून ध्वजवंदन कार्यक्रम घेण्यात यावा, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button