breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मादागास्करमध्ये बत्सिराई चक्रीवादळाने 21 जण ठार; 60 हजार नागरिक बेघर

मादागास्कर | टीम ऑनलाइन

बत्सिराई  या चक्रीवादळानं मादागास्करमध्ये मोठा कहर माजवलाय. वादळामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बत्सिराई हे दोन आठवड्यांतील दुसरे मोठे वादळ असून 235 किमी वेगाने पूर्व किनारपट्टीवर धडकले. या चक्रीवादळामुळं अनेक घरं उद्ध्वस्त झाली असून किमान 21 जण ठार झाल्याची माहिती आहे. यासोबतच या चक्रीवादळामुळं सुमारे 60 हजार लोक बेघर झाले आहेत.

राज्य आपत्ती निवारण एजन्सीनं सांगितलं की, 14 हजारांपेक्षा जास्त कुटुंबं उघड्यावर आली असून 60 ते 70 हजार लोक बेघर झाली आहेत. बत्सिराई या चक्रीवादळामुळं मादागास्करमध्ये पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या दोन आठवड्यांत 55 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. मादागास्करच्या हवामान विभागानं  सांगितलं की, पावसामुळं देशाच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. हिंद महासागरातील महासागर द्वीपमध्ये हाहाकार माजवल्यानंतर चक्रीवादळ कमकुवत झाले, तसेच या चक्रीवादळाचा सरासरी वाऱ्याचा वेग जवळपास निम्मा 80 किमी प्रतितास झाला आहे.

वादळामुळं हातातोंडाशी आलेलं पीक आणि फळे, भाजीपाल्याचीही नासधूस झालीय. जोरदार वाऱ्यामुळं अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय. समुद्राच्या वाढत्या लाटांमुळं मांझरी शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शहरातील सुमारे 95 टक्के भागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं मादागास्करवर उपासमारीचं संकट उभारलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button