breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाळेच्या स्वच्छतेकामी 1 कोटी 22 लाखाचा प्रस्ताव, आरोग्य विभागाची ठेकेदाराला ‘शाब्बासकी’

  • अधिकच्या 42 कर्मचा-यांची नेमणूक करण्याची ठेकेदाराची मागणी
  • स्थायीच्या मान्यतेसाठी आरोग्य विभागाने केली शिफारस

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि दोन औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या स्वच्छतेसाठी 186 कर्मचारी कार्यरत असताना आता आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून चालविल्या जाणा-या शाळांची स्वच्छता करण्यासाठी 42 कर्मचारी नेमणूक करण्यात येणार आहेत. त्याकरिता तब्बल 1 कोटी 22 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी आरोग्य विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी स्थायीसमोर ठेवला आहे. यावरून मे. ब्रिस्क इंडिया प्रा. लि. संस्थेच्या कामावर आरोग्य विभाग जाम खूश असल्याचे दिसते. यामुळेच की काय ?, त्यांना वाढीव कामासाठी पायघड्या घातल्या जात आहेत.

शिक्षण विभागाच्या 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळेतील वर्गखोल्यांची साफसफाई करणे, शाळेच्या परिसरातील स्वच्छता करणे, पालिकेच्या दोन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील खोल्यांची साफसफाई आणि स्वच्छता गृहांची यांत्रीकी पध्दतीने स्वच्छता करण्याचे काम दोन वर्षाच्या मुदतीवर मे. ब्रिस्क इंडिया प्रा. लि. संस्थेला दिले आहे. याबाबतच्या ठरावाला 28 फेब्रुवारी 2019 रोजी स्थायीने मान्यता दिली. 26 जुलै 2019 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. 1 ऑगस्ट 2019 पासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. 186 कर्मचा-यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. आता हे कर्मचारी अपुरे पडत असल्याचा साक्षात्कार ठेकेदाराला झाला आहे. मुख्याध्यापकांचे पत्र जोडून आकांक्षा फाऊंडेशनच्या शाळांकरिता अधिकच्या 42 कर्मचा-यांची नेमणूक करण्याची मागणी त्याने केली आहे.

प्राथमिक शाळेच्या स्वच्छतेसाठी 30 कर्मचारी, माध्यमिक शाळेसाठी 11 आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रसाठी 1 अशा एकूूण 42 कर्मचा-यांची उपलब्धता अपेक्षीत धरली आहे. कामाची मुदत ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. ही मुदत संपेपर्यंत काम करून घेण्यासाठी 42 कर्मचा-यांच्या मानधनावर तब्बल 1 कोटी 22 लाख 84 हजार 349 रुपये खर्च दर्षविला आहे. त्याला मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी स्थायी समीतीच्या टेबलावर ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button