breaking-newsमुंबई

शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीस अटक

कोपरगाव | महाईन्यूज

मुलीला मोबाइल घेऊ न देऊ न सुरुवातीला गोड बोलून नंतर तिला व तिच्या आजीला जिवे मारण्याची धमकी देऊन एका तरुणाने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. अविनाश नारायण पंडोरे (वय २८, रा. मोहिनीराजनगर) कोपरगाव याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिलेली आहे.

पीडित मुलगी आई व आजी सोबत राहत असून ती नववीत आहे. मुलीचा वारंवार मोबाइलवर बोलण्याचा संशय आल्याने शाळेच्या शिक्षिकेने त्याची चौकशी करून तिचा मोबाइल ताब्यात घेतला तेव्हा मोबाइल वर असलेले संदेश वाचून शिक्षिकेने मुलीच्या आईला बोलावून घेतले. नंतर मुलीस संदेशांबाबत विचारले असता तिने घडलेली घटना सांगितली. याप्रकरणी मुलीने आरोपीविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सोमनाथ वाघचौरे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button