breaking-news

चाइल्ड पोर्नोग्राफीचे दोन गुन्हे दाखल, १४ जणांचा शोध सुरू

नगर | महाईन्यूज

लहान मुलांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावरील अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर (चाइल्ड पोर्नोग्राफी) पाठवणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्य़ात गुन्हे दाखल करण्यास सायबर क्राइम पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस दलास राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) १६ व्यक्तींची यादीच पाठवली आहे. त्यातील दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

महेंद्र ऊर्फ माही भानुदास ठाणगे (३१, रा. कातड्र, राहुरी) याला दि. २३ जानेवारीला तर फिरोज कादर शेख (४१, आलमगीर, शहा कॉर्नर, भिंगार, नगर) याला काल, सोमवारी नगरच्या सायबर क्राइम पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्यांकडून व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी वापरलेले दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (बी) अन्वये दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्य़ात ५ वर्षे सक्तमजुरी व १० लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी, सायबर क्राइम पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांनी दिली. या संदर्भात पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button