breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

शाओमीचा 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

चीनच्या स्मार्टफोन कंपनीने आपला MI 10 lite (5G) ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगनचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चार रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. भारतात हा स्मार्टफोन ३१ मार्च रोजी लाँच करण्यात येणार होता.मात्र, भारतात लॉकडाऊन असल्याने या फोनची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होईल, हे कंपनीकडून अद्याप सांगण्यात आले नाही. मात्र, एप्रिलच्या अखेरपर्यंत हा फोन भारतात लाँच होण्याची शक्यता आहे…

MI 10 lite (5G) या स्मार्टफोनची किंमत ३४९ यूरो म्हणजेच २९ हजार २०० रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन किती रॅमचा असणार आहे, याची माहिती अद्याप उघड केलेली नाही. मात्र, ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात येईल असे सांगितले जात आहे. तसेच या फोनमध्ये ६.६७ इंचाचा अमोलेड ट्रू कलर डिस्प्ले आहे. वॉटरनॉच देण्यात येईल.

या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर काम करेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहे. पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असणार आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कॅमेरा दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी ४,१६० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन युजर्संना ब्लू, ग्रीन, व्हाईट आणि ग्रे या चार रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनचे वजन १९२ ग्रॅम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button