breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात करोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक लस

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|

चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसनं आतापर्यंत हजारो बळी गेले आहेत. या व्हायरसच्या विळख्यात जगातील अनेक देश सापडले आहेत. हा व्हायरस रोखण्यात अपयश आलं असताना, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं करोना व्हायरसला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात यश मिळवलं आहे.

अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध असून, सहा महिन्यांनतर एखाद्या व्यक्तीवर या लसीची चाचणी केली जाईल.

करोना रोखण्यासाठी एसआयआय आणि कोडाजेनिक्सद्वारे विकसित करण्यात आलेली लस या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी एक सुरक्षाकवच असल्याचा दावा केला जात आहे. ‘ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. ही लस सहा महिन्यांत मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगानं या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झालं आहे, असं एसआयआयचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button