breaking-newsराष्ट्रिय

कॉंग्रेसचे सैफुद्दीन सोज यांनी केले काश्‍मीर स्वातंत्र्याचे समर्थन – भाजपाचे टीकास्त्र

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे एक वरिष्ठ नेते सैफुद्दीन सोज यांनी काश्‍मीरच्या स्वातंत्र्याचे समर्थन केल्याने ते विवादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोज यांच्या निवेदनावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

काश्‍मीरी जनता पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही. स्वतंत्र कश्‍मीर ही काश्‍मिरी जनतेची पहिली पसंती आहे, असे मुशर्रफ यांनी म्हटल्याचा संदर्भ देत सैफ यांनी म्हटले आहे, की मुशर्रफ यांचे म्हणणे तेव्हा योग्य होते आणि आजही योग्य आहे. माझेही मत आज असेच आहे. परंतु असे होणे शक्‍य नाही, असे काश्‍मीरबाबत केलेल्या एका निवेदनात सैफुद्दीत सोज यांनी म्हटल्याची माहिती देण्यात आली आहे. काश्‍मीरला स्वातंत्र्य दिले तर शांती नांदेल आणि लढायाही होणार नाहीत, असे सोज यांचे म्हणणे आहे.

सोज यांच्या या निवेदनावरून भाजपने कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. जर सोज यांना मुशर्रफ आवडत असतील, तर त्यांना पाकिस्तानचे एकेरी तिकिट काढून पाकिस्तानात पाठवून द्यावे, असे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button