breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानातील 90 हिंदुंना भारतीय नागरीकत्व

अहमदाबा – अनेक वर्षांपुर्वी पाकिस्तानातून निर्वासित होऊन भारतात आलेल्या 90 हिंदुंना भारतीय नागरीकत्व देण्यात आले आहे. हे निर्वासित गुजरातमधल्या अहमदाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जिल्हाधिकारी विक्रांत पांडे यांनी या नागरीकांना नागरीकत्वाचे प्रमाणपत्र आज हस्तांतरीत केले. शेजारीाल देशातल्या हिंदु आणि शीख अल्पसंख्यांकाना भारतीय नागरीकत्व देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सन 2016 साली विकेंद्रीत केली आहे त्यानुसार आम्ही त्यांना हे नागरीकत्व बहाल केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी पांडे यांनी दिली.

आता हे नागरीक भारतीय झाले असल्याने त्यांना आधार आणि पासपोर्टासाठी भारतीय नागरीक म्हणून अर्ज करता येईल. हे नागरीक पकिस्तानातील दहशतीला कंटाळून भारतात आले आहेत. त्यासाठी त्यांना तेथील आपला व्यवसाय सोडून द्यावा लागला आहे. आपली सारी मालमत्ताही सोडून हे नागरीक लॉंग टर्म व्हिीसाच्या आधारे भारताच्या आश्रयाला आले आहेत.

यापैकी भरतकुमार खतवाती यांनी सांगितले की आपण कराचीत राहात होतो. पण तेथे अत्यंत सहजपणे हिंदुंना लक्ष्य केले जात आहे. तेथे हिंदुंना आपली ओळख लपवून राहावे लागत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी नागरीकत्व मिळालेल्या अनेक नागरीकांना आपला पाकिस्तानातील अनुभव सांगितला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button