breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शहर भाजपा विद्यार्थी आघाडीच्या रक्तदान शिबीराला प्रतिसाद
पिंपरी / महाईन्यूज
कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 67 जणांनी रक्तदान केले.
२४ डिसेंबर २०२० रोजी मोरवाडी, पिंपरी येथे शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी महापौर तुशार हिंगे, नगरसेवक राहुल जाधव, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, चिटणीस प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.