breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

AUS vs IND, 2nd Test: भारताची 131 धावांची निर्णायक आघाडी

मेलबर्न – ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावांत भारत 326 रन्सवर ऑलआऊट झाला आहे. भारताने पहिल्या डावांत 131 रन्सची आघाडी घेतली आहे. अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 131 रन्सची निर्णायक आघाडी घेतली आहे. रहाणेला जडेजाची चांगली साथ लाभली. जडेजाने 57 रन्सची खेळी केली. .

तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील खेळ सुरु झाला तेव्हा काल झुंजार शतक ठोकलेल्या अजिंक्य रहाणेकडे आजच्या दिवशी भारतीयांचं लक्ष लागलं होतं. मात्र लबुशेननने त्याला 112 रन्सवर रनआऊट केलं. त्यानंतर रविंद्र जडेजाने झुंजार अर्धशतक ठोकलं. अर्धशतकानंतर आक्रमक फटका खेळण्याच्या नादात 57 रन्सवर जडेजा कॅचआऊट झाला. आर.अश्विनही रन्स जमवण्याच्या नादात कॅचआऊट झाला.

भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 112 रन्स, रविंद्र जाडेजाने 57 रन्स तर शुभमन गिलने 45 रन्स केले. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने 2 विकेट्स तर जोश हेजलवूडने 1 विकेट्स घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button