breaking-newsआंतरराष्टीय

हिंदू, शीखांवरील हल्ल्याची इसिसने स्वीकारली जबाबदारी

काबूल – अफगाणिस्तानमध्ये रविवारी हिंदू आणि शीखांना लक्ष्य करून झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इसिस या खतरनाक दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. त्या हल्ल्यात 19 जण मृत्युमुखी पडले, तर 20 जण जखमी झाले. मृतांमध्ये 17 हिंदू आणि शीखांचा समावेश आहे.

अफगाणचे अध्यक्ष अश्रफ घनी रविवारी जलालाबाद शहराच्या दौऱ्यावर होते. त्यांना भेटण्यासाठी निघालेल्या हिंदू आणि शीखांच्या गटांना लक्ष्य करून इसिसने आत्मघाती हल्ला घडवला. अफगाणमध्ये हिंदू आणि शीख अल्पसंख्याक आहेत. इस्लामिक कट्टरपंथीयांनी त्यांना लक्ष्य केल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. अफगाणमध्ये 70 च्या दशकात 80 हजारहून अधिक हिंदू आणि शीख राहत होते.

मात्र, सातत्याने भेदभावाचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात देशांतर केले. त्यामुळे आता अफगाणमध्ये केवळ 1 हजार हिंदू आणि शीखांचीच वस्ती असल्याचे समजते.

दरम्यान, इसिसने घडवलेल्या आत्मघाती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांत शीख समाजाचे नेते अवतारसिंग खालसा यांचाही समावेश आहे. ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. आत्मघाती हल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याने अफगाणमधील हिंदू आणि शीख समाजांत दु:खाबरोबरच संतापाची लाट पसरली आहे. अफगाण सरकारकडून आपली बिल्कूल काळजी केली जात नसल्याची त्या समाजांची भावना बनली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button