पिंपरी / चिंचवड

शहर पोलीस मित्र संघटनेच्या शहराध्यक्षपदी संदीप नखाते

पिंपरी – महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी रहाटणीतील व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते यांची नियुक्ती करण्यात अली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, उपाध्यक्ष कमलेश पवार, सचिव योगेश शिंदे, आकाश चिंचवडे, दत्ता दाखले, तुषार कोकणे, मुकेश बाफना, प्रकाश जेंगळे, सुमित दरंदले, सचिन काळे, विशाल गुरव, अविनाश वाघमारे, विनोद वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.
पोलीस मित्र संघटनेचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष संदीप नखाते हे महापालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे स्विकृत नगरसेवक आहेत. तसेच, गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातून सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते म्हणाले की, पोलिस मित्र संघटना ही एक मान्यताप्रात संघटना असून गेली ३० वर्षे पोलीस त्यांचे कुटुंबीय व नागरिकांसाठी कार्यरत असून विविध उपक्रम राबवित आहे. पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून पोलिसांना त्यांच्या हक्कासाठी लढणारा पर्याय मिळाला आहे. पोलिसांच्या अनेक मागण्या व प्रश्न शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा संघटना करीत आहे.

संदीप नखाते म्हणाले की, शहरात पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातील. तसेच, उत्सवामध्ये पोलिसांना बांदोबस्तात सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button