breaking-newsमनोरंजन

संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात झळकणार ‘हा’ नवा स्टारकिड

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिडच्याच नावाची चर्चा सुरु असून अनेक सेलिब्रेटींची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसापूर्वीच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुलीने जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.त्यानंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खानदेखील ‘केदारनाथ’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये येणार आहे. विशेष म्हणजे या स्टारकिडच्या यादीत आणखी एकाचं नाव जोडलं गेल असून या स्टारकिडला संजय लीला भन्साळी बॉलिवूडमध्ये आणणार आहेत.

बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे संजय लीला भन्साली यांनी रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांना चंदेरी दुनियेची वाट दाखविली. या दोघांनंतर आता ते अभिनेत्री पुनम ढिल्लो आणि अशोक ठकेरिया यांच्या मुलाला लॉन्च करणार आहे. भन्साळी त्यांच्या आगामी चित्रपटामधून अनमोलला चित्रपटसृष्टीत आणणार असून या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे.

सध्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘ट्युस डे अँण्ड फ्राय डे’ Tuesdays And Fridays असं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये अनमोल झळकणार असल्याची घोषणा भन्साळी यांनी केली आहे. त्याबरोबरच या प्रोजेक्टसाठी त्यांनी टी-सीरीजबरोबर हातमिळविणी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘अनमोल २४ वर्षापूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार नाही. कारण पडद्यावर वावरण्यासाठी योग्य समज येणं गरजेची असते. त्यामुळे तो २४ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज होईल’ असं त्या म्हणाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button