breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे महापालिकेतील कर्मचा-यांनी घेतले पिंपरी पालिकेकडून कामकाजाचे धडे

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय कामकाजाची माहिती घेण्यासाठी पुणे महापालिकेतील वर्ग चारच्या कर्मचा-यांनी महापालिकेला आज भेट दिली. महापालिकेतील सर्व विभागांतील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्याशी चर्चा केली.

पुणे महापालिकेतील वर्ग चारच्या कर्मचा-यांना एका खासगी संस्थेमार्फत कामकाज करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत संबंधित संस्थेने या कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाची माहिती करवून देण्यासाठी पालिकेत भेट दिली. त्यांनी प्रामुख्याने सारथी हेल्पलाईन, कर संकलन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, पाणी पुरवठा, स्थापत्य, आरोग्य या विभागांत भेट देऊन प्रत्यक्ष कामकाज कशा पध्दतीने चालते, याची माहिती जाणून घेतली. सारथी हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निराकरण कशा पध्दतीने केले जाते. त्याची माहिती तक्रारदारांना कळविली जाते की नाही, अशा अनेक प्रश्नांचे निरसन या विभागातील अधिका-यांनी केले.

महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, एसटीपी प्रकल्प, पंप्पींग स्टेशन, रावेतचा बंधरा अशा महत्वाच्या मुद्यांची माहिती या विभागातील अधिका-यांशी चर्चा करून त्यांनी घेतली. त्यानंतर कर्मचा-यांनी महापौर राहूल जाधव यांची भेट घेतली. त्यांच्याशी काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button