breaking-newsपुणे

शहरी गरिबांना उपचारासाठी मिळणार 2 लाखांचा खर्च

  • निराधार ज्येष्ठ, अनाथांना उत्पन्न दाखल्याची अट वगळली

पुणे – शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पॅनेलवरील खासगी रुग्णालयात अंतर्गत विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी एक लाखाची मर्यादा रक्कम दोन लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेअंतर्गत सभासदत्व मिळण्यासाठी वय वर्षे 60 पेक्षा जास्त वय असलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना व अनाथ मुलांना उत्पन्न दाखल्याची अट वगळण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

शहरी गरीब योजने अंतर्गत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, या योजनेसाठी प्रशासनास अंदाजपत्रकात आता 50 कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांचे पॅनेलवरील खासगी रुग्णालयामधील गंभीर स्वरुपाच्या आजाराचे वैद्यकीय उपचारांच्या खर्चासाठी शहरी गरीब वैद्यकीय योनजेअंतर्गत एका आर्थिक वर्षासाठी एक लाख रुपये कमाल मर्यादेपर्यंत सीजीएचएस (केंद्र शासनाने निश्‍चित केलेले दर) मान्य दराने आरोग्य विमा देण्यात येतो. या अंतर्गत

योजनेचा लाभ घेताना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी अडचणीचे ठरत असल्या कारणाने वय वर्षी 60 पेक्षा जास्त वय असलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्न दाखल्याची अट वगळण्यात यावी, तसेच महापालिकेच्या हद्दीतील अनाथांना या योजनेत समाविष्ट करून सभासदत्त्व उत्पन्न दाखल्याची अट वगळावी, असे प्रस्तावात म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button