breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Euro Cup 2020 : जग्गजेता फ्रान्स स्पर्धेबाहेर; स्वित्झर्लंड थाटात उपांत्यपूर्व फेरीत दाखल

ब्रुसेल्स – युरो कप २०२०मध्ये काल झालेला फ्रान्स विरुद्ध न्यूझीलंड सामना अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. स्वित्झर्लंडच्या संघाने जग्गजेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-५च्या फरकाने धुव्वा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्वित्झर्लंडच्या यान सोमेरने फ्रान्सचा स्ट्राइकर केलियन माबपेने मारलेला पेनल्टी शॉर्ट अडवला आणि हा धक्कादायक निकाल जगासमोर आला.

स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स सामन्यामध्ये फ्रान्सचं पारडं जड असेल असं अधीपासून मानण्यात येत होतं. हे अगदी सामन्याच्या ८१ व्या मिनिटापर्यंत दिसून आलं. दोन ३-१ च्या फरकाने फ्रान्स अपेक्षित विजय मिळवले असं मानलं जात असतानाच स्वित्झर्लंडच्या संघाने शेवटच्या दहा मिनिटांमध्ये दोन गोल करत सामना ३-३ च्या बरोबरीत सोडवला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना ३-३च्या बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला. मात्र फ्रान्सच्या माबपेचा अगदी शेवटचा शॉर्ट यान सोमेरने अडवला आणि सामना ५-४च्या फरकाने स्वित्झर्लंडने जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे.

विशेष म्हणजे १९३८ नंतर पहिल्यांदाच स्वित्झर्लंडने बादफेरीच्या पुढे मजल मारली आहे. तर कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्वित्झर्लंडने धडक मारण्याचा योग हा ६७ वर्षानंतर जुळून आला आहे. यापूर्वी ते १९५४मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button