breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरात चोरींच्या घटनेत वाढ, अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल

मुंबईः पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चोरीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात दिघी, भोसरी एमआयडीसी, वाकड, देहुरोड याठिकाणी चोरट्यांनी डल्ला टाकला.

दिघी येथे चोरट्यांनी लॅपटॉप, चार्जर, मोबाईल, हेडफोन, पॅनकार्ड, पर्स असा 33,200 हजार रूपयांची चोरी केली. भोसरी येथे 15,000 रुपयांची, एम आय डी सी परिसरात 30,000 हजार रूपयांची, वाकड येथे 80,000 रूपयांची तर देहुरोड येथे 10,000 हजार रूपयांच्या मोटारसायकलींची चोरी झाली.

सदर गुन्ह्यांत पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

उद्योगनगरीत सततच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलीसांनी योग्य ती कार्यवाही करून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button