breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील सव्वातीन लाख बालकांना गोवर-रुबेला लसीकरण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत सोमवार (दि. 17) पर्यंत 3 लाख 21 हजार 486 बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

या मोहिमेला 27 नोव्हेंबर पासून सुरूवात झाली. महापालिकेंतर्गत 913 मनपा आणि खासगी शाळा, नर्सरी, बालवाडी, अंगणवाडी व मनपा रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आले. आजअखेर 3 लाख 21 हजार 486 बालकांना ही लस देण्यात आली. लसीकरण मोहिमेत 6 लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे.

शालाबाह्य बालके व ज्या बालकांना अद्याप गोवर-रुबेला लसीकरण झाले नाही. अशा बालकांसाठी बाह्य संपर्क लसीकरण सत्रांचे आयोजन केले आहे. लसीकरणासाठी पालकांनी नजिकचे मनपा दावाखाने व रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी, पीएचएन, एनएम यांच्याशी संपर्क साधावा. मोहिमेचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी साहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button