ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की; दोघांना अटक

पिंपरी चिंचवड | मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कांजी हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्‍काबुक्‍की करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना म्हाळुंगे येथील नांदेरोडवर घडली.अमोल पंढरीनाथ ढोबळे (वय 31, रा. पिंपळे गुरव) आणि विनोद अशोक पोळ (वय 32, रा. पारगाव भिमाशंकर सह. साखर कारखाना, हुंडाळे कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ तुकाराम रणपिसे यांनी शनिवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे-नांदे रोडवर असलेल्या कांजी हॉटेल मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कारवाईसाठी गेले असता हॉटेलमधील ग्राहक असलेले आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. ‘तुम्ही आत कसे आलात, आमचे रेकॉडिंग करता काय’, असे म्हणत पोलिसांना धक्‍का-बुक्‍की करीत हॉटेलच्या बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या वर्दीलाही हात लावला. पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button