breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील बालकांसाठी रविवारी (दि. 19) महापालिकेतर्फे लसिकरण मोहीम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड मनपा परिसरामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रविवारी (दि. 19) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून केले आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी (दि. 19) पिंपरी-चिंचवड मनपा परिसरामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम घेण्यात येणार आहे. पालिकेच्या परिसरात 876 लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 55 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 210 पर्यंवेक्षक व 2 हजार 651 लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 876 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने।रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा 795 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 31 ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 70 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय
केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग आदी माध्यमाद्वारे करण्यात आला आहे.

आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणाऱ्या 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापौर व आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button