breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराच्या नवनिर्मितीसाठी महापालिकेतर्फे ”फेस्टिवल ऑफ द फ्युचर”

पिपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

युवा उदयोजकांना व नव्याने उदयोग उभारणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना प्रोत्साहन देऊन उद्योग निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे, त्यांचे कौशल्य वाढ करणे, नागारिकांचे आरोग्य सुदृड राखणे, २०३० पर्यंत पर्यावरण पूरक व राहण्यायोग्य शहर निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिचवड महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालयामार्फत धोरण तयार केले आहे.

आंतरराष्ट्रीय पिंपरी-चिंचवड ”फेस्टिवल ऑफ द फ्युचर” उपक्रम राबविण्यात येणार असून २८ व २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्या अंतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नवउद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन व नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन असे उपक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत सांगितली. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सहायक आयुक्त निळकंठ पोमण, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांमधून व युवकांमधून उद्योजक घडविणे, युवकांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी प्रयत्न करणे, हे पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय फेस्टिवल ऑफ फ्युचरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय फेस्टिवल ऑफ फ्युचर अंतर्गत विविध समस्यांवर नागरिकांच्या कल्पनांचा समावेश करणे, उदयन्मुख व स्टार्टअप व्यासपीठ मिळवून देणे, त्याच्या माध्यमातून त्यांना गुंतवणूकदार मिळवून देणे, शहरातील नागरिकांमधून उद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे इत्यादीचा समावेश असणार आहे. तसेच, शहरातील २० नाविन्यपूर्ण स्टार्टअपच्या उद्योजकांच्या व्यावसायिक प्रकल्पांचे प्रदर्शन देखिल होणार आहे.

पिपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय फेस्टिवलच्या माध्यमातून नवोदीत आणि नाविन्यपूर्ण उद्योजकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी आहे. अंदाजे 1000 स्टार्टअप प्रमोटर सहभागी होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापौर आणि आयुक्तांनी संगितली.  

स्टार्टअप कार्यक्रमातील चार महत्त्वाच्या बाबी

1) पीसीएमसी सिटीझन हॅकेथॉन : नागरिकांनी नवीन कल्पनांवर विचार करावा आणि शहरातील अडचनींवर नवीन उपाय सुचवावेत यासाठी हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. 

२) पीसीएमसी स्टार्टअप पिचफेस्ट : पात्र टीयू स्टार्टअप, यशवी होनीसाथी तासेच तांचचा विस्तार व्हावा यासाथी गुंटावानुक, पीओसी, कॉर्पोरेट आणि शासकीय शासन. 

3) पीसीएमसी स्पीकर सीरिज : पिंपरी-चिंचवड परिसरातील तरुणांना व्यावसायिक कौशल्य, वाढईसाठी किंवा व्यावसायिक शिक्षण आणि संबंधित माहिती देण्यासाठी देशातील आणि परदेशातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन शिबीर घेण्यात येनार आहे.

4) पीसीएमसी स्टार्टअप शोकेस : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 20 नाविन्यपूर्ण स्टार्टअप प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button