breaking-newsपिंपरी / चिंचवड

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाकडमधून बळीराजाला आर्थिक मदत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीतील राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. वाकडचे युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली कस्पटे यांनी 21 हजार रुपयांचा निधी दिला आहे.

आज शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधून फ्लेक्सबाजी आणि जाहिरातबाजीला फाटा देत वाकड येथील युवा कार्यकर्ते कस्पटे यांनी राज्यातील बळीराजाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 21 हजार रुपयांचा धनादेश कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, शिवाजीराव गर्जे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी कार्यकर्ते समीर कस्पटे, तानाजी अत्रे, सागर माने आदी उपस्थित होते.  कस्पटे यांचे हे कार्य अखंड राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button