breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगलीत गुंड सनी कांबळेवर खुनी हल्ला

सांगली –  सांगली शहरात गँगवार पुन्हा भडकले असून भरदिवसा पाठलाग करुन अज्ञात हल्लेखोरांनी गुंड सनी कांबळे याच्यावर हल्ला केला. सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी कांबळे याच्यावर कुकरीने खुनी हल्ला करण्यात आला आहे. कॉलेज कॉर्नरजवळच्या अक्षरम हॉटेल शेजारील रस्त्यावर सनी कांबळेवर हल्ला करण्यात आला.

सनीवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्याचे केसेस आहेत. त्याच्यावर घाटनांद्रे कवठेमहांकाळ येथील खुनाचा आरोपही आहे. कुपवाड़ संजयनगरमध्ये त्याची दहशत आहे. नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेतील सनी कांबळेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले. घटनास्थळी हल्लेखोरांनी वापरलेली कुकरी सापडली आहे. या हल्ल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button