breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

व्हॉट्सअ‍ॅपबाबत धक्कादायक माहिती समोर,गुगल सर्चमध्ये दिसतायत व्हॉट्सअ‍ॅप नंबर

व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे आद सर्वांच्याच मोईलमधला सर्वात महत्त्वाचा आणि गरजेचा असा अ‍ॅप मानला जातो…कारण यामुळेच आपण अगदी कोणाशीही सहज संपर्क करू शकतो..मात्र आता याच व्हॉट्सअ‍ॅपबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर असलेला आपला मोबाईल क्रमांक गुगल सर्चमध्ये दिसत असल्याची  ही धक्कादायक  माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंशी लिंक असलेला आपला फोन क्रमांक कोणाही गुगलमध्ये सर्च करून पाहू शकतो असा दावा एका रिसर्चरनं केला आहे. तसंच एखाद्या युझरसाठी हा प्रायव्हसी इश्यू असल्याचं म्हटलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या क्लिक टू चॅट या फिचरमुळे युझरचा मोबाईल क्रमांक गुगलवर सर्च होतो आणि यावर कोणाही मेसेज करू शकतं असाही दावा या रिसर्चरनं केला आहे.

बग बाऊंटी हंटर अतुल जयराम यानं याचा शोध लावला आहे. तसंच युझरचे फोन नंबर लीक होत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. दरम्यान हा एकप्रकारचा सिक्युरिटी बग असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील क्लिक टू चॅट या ऑप्शनमुळे युझरला वेबसाईट्सवर विझिटर्ससोबत चॅट करण्याचा पर्याय मिळतो. हे फिचर क्यूआर कोडच्या मदतीनं काम करतं. तसंच एका युआरएलवर क्लिक करूनही चॅट करणं शक्य आहे.

साईटवर येणारा व्हिजिटर दिल्या गेलेल्या क्युआर कोडला स्कॅन करून अथवा लिंकवर क्लिक करून चॅटिंग करू शकतो. तसंच त्यासाठी त्याला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाची गरज भासत नाही. एकदा चॅटिंग सुरू केल्यानंतर त्यात व्हिजिटरचा मोबाईल क्रमांक दिसू लागतो. असे क्रमांक थेट गुगलवर सर्च होत असल्याचा दावा जयराम यानं केलं आहे. सर्च इंजिन चॅन मेटाडेटालादेखील इनडेक्स करतं. युझरचा मोबाईल क्रमांक https://wa.me/<0PhoneNumber)> या यूआरएल वरून गुगल सर्चवर दिसतो.

दरम्यान याबाबत व्हॉट्सअ‍ॅपनेही स्पष्टीकरण दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक टू चॅट हे फिचर देण्यात आलं आहे. तसंच त्यात प्रायव्हसी बग सारखं काही नाही. सार्वजनिक वेबसाईट्सवर चॅटिंगसाठी ऑप्शन दिला आहे केवळ त्यांचेच मोबाईल क्रमांक ऑनलाइन उपलब्ध असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे रिसर्चरच्या म्हणण्यानुसार युझर्सला त्यांचे मोबाईल क्रमांक प्लेन टेक्स्टमध्ये दिसत असल्याची कल्पना नाही. तसंच या मोबाईल क्रमांकाचा गैरवापरही केला जाऊ शकतो आणि अनेक युझर्सच्या फोटोंच्या मदतीनं त्यांच्या सोश अकाऊंट्सपर्यंतही पोहोचता येऊ शकतं, असंही त्यानं म्हटलं आहे.

त्यामुळे सध्याच्या सोशल मिडियाच्या दुनियेत काहीही अशक्य नसल्यानं आपण कोणत्याच सुरक्षेची हमी बाळगू शकत नाही.त्यामुळे  आपण वापरत असलेल्या प्रत्येक अ‍ॅपबाबत थोडंस सावधान असलेलंच बरं…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button