breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश

मुंबई – टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपने घेतल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता याप्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड याप्रकरणी तपास करत आहेत. याप्रकरणात अद्याप तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे. त्यावर तपासानंतर आम्ही त्यांना अहवाल पाठविणार आहोत, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, २२ वर्षीय पूजा ही मूळची बीड जिल्ह्यातील परळीची होती. ती सोशल मीडियावर अत्यंत ऍक्टिव्ह होती. टिकटॉकवर ती सातत्याने व्हिडीओ टाकायची. ती टिकटॉक स्टार होती. टिकटॉकवर तिचा मोठा फॅन फॉलोइंग होता. तसेच ती सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात सातत्याने सक्रिय असायची. ती काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी बीडवरून पुण्याला आली होती. पुण्यात येऊन तिला दोनच आठवडे झाले होते. पुण्यातील वानवडी येथील महमंदवाडीच्या हेवन पार्क सोसायटीत ती , तिचा चुलत भाऊ आणि एक राहत होते. मात्र पूजाने 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तिने घराच्या बाल्कनीतून उडी मारली. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाल्याचंही सांगितलं जात आहे. पुण्यात येऊन दोनच आठवडे होत नाहीत तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button