breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शरद पवारांना मोठा धक्का! ‘या’ ७ आमदारांचा अजित पावरांना पाठिंबा

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्या सोबत अंदाजे ४० आमदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी सात आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

नागालँड मध्ये राष्ट्रवादीने आधीच एन-पी-पी-भाजपच्या युतीला पाठिंबा दिला होता. दरम्यान, नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग यांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्रात सुनील तटकरे यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार गटाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांना आता राष्ट्रीय पातळीवर देखील मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर आज पुन्हा बचावकार्याला सुरूवात, आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू

नागालँडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागालँडने हा निर्णय घेतला आहे की इथे आमदार आणि पदाधिकारी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना पाठिंबा देतील. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करू, असं म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button