breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लवकरच; ग्रुपमध्ये अॅड करण्यास घ्यावी लागणार परवानगी

मुंबई – व्हॉट्सअॅप युझर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपला आणावं लागणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं फीचर बनवण्याचे आदेश दिले आहेत. या फीचरमुळे कोणी  तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करणार असेल, तर आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल.

सध्याच्या फीचरनुसार कोणीही सरसकट कोणालाही ग्रुपमध्ये विनापरवानगीने अॅड करु शकतो. त्यामुळे काहींना इच्छा नसूनही विविध ग्रुपमध्ये राहावं लागतं. ग्रुपमधून बाहेर पडणंही कधीकधी अवघड होतं. त्यामुळे नव्या फीचरमुळे युझरच्या परनवानगीशिवाय त्याला ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही. कोणालाही विनापरवाना कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केलं जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचललं आहे.  सरकारी यंत्रणा सर्व तक्रारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पाठवत होते. त्यानंतर या मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला हे फीचर आणण्यास सांगितलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button