breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronaVirus: चिंताजनक! नागपुरात गेल्या चार महिन्यात 92 गर्भवती महिलांना कोरोना विषाणूची लागण

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पण याच दरम्यान नागपुरातील गर्भवती महिला हिम्मतीनं कोरोनावर मात करत असल्याचे समोर आले आहे. नागपुरात गर्भवती महिलांभोवती कोरोनाचा विळखा आहे. गेल्या चार महिन्यात 92 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. जुलै महिन्यात 60 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत 62 गर्भवती महिलांची प्रसुती सुरक्षित झालेली आहे.

नागपुरातील मेयो आणि मेडिकलच्या डॉक्टरांचं मोठं यश हे मानलं जात आहे.जुलै महिन्यात 42 कोरोनाबाधित गर्भवती महिलांची प्रसुती झाली आहे. नागपुरातील सर्वच गर्भवती कोरोनाबाधित आईकडून कोरोना निगेटीव्ह बाळाला जन्म देण्यात आला आहे. राज्यातही आतापर्यत मोठ्या प्रमाणात गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने गर्भवती महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या आहेत. त्यासोबत गर्भवती महिलांनी जन्म दिलेले बाळही कोरोना निहेटिव्ह जन्मास आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button