breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रामाणिक कर्मचा-यांचे शहर विकासातील योगदान हे अनन्यसाधारण – महापौर माई ढोरे

पिंपरी / महाईन्यूज

समाजभान आणि सद्सदविवेक बुध्दीने प्रामाणिक कर्तव्य बजावणा-या महापालिका कर्मचा-यांचे शहर विकासात असलेले योगदान अनन्यसाधारण असून नवोदित कर्मचा-यांसाठी ते आदर्शवत आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

माहे ऑक्टोबर २०२० अखेर नियत वयोमानानुसार आणि स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य तुषार हिंगे, शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघ अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी अविनाश ढमाले, योगेश वंजारी, धनाजी थोरवे, बाळासाहेब कापसे, सुरेश गारगोटे, नवनाथ शिंदे, मिलिंद काटे, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-यांमध्ये बालरोगतज्ञ डॉ. प्रतिभा शामकुंवर, उपअभियंता प्रकाश साळवी, केमिस्ट स्वाती वडझिरकर, लेखापाल यशवंत शेळकंदे, मुख्य लिपिक विद्या आरडे, कनिष्ठ अभियंता आनंद नायडू, सहाय्यक शिक्षिका पद्मावती बैरागी, निदेशक संजय जाधव, उपशिक्षिका सुप्रिया शेलार, रखवालदार दिलीप निकम, लिपिक नारायण ढोरे, वाहनचालक प्रदिप गायकवाड यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये मुख्यलिपिक अंजली बोडस, एएनएम मनिषा होले, सफाई कामगार मिना मोरे, मीरा जाधव, आशा सुरवाडे, रमेश मांडेकर, गटरकुली अविनाश बलकवडे, कचराकुली राम पालखे यांचा समावेश आहे. सेवानिवृत्ती हा कोणत्याही कर्मचा-याच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर वेगळ्या चाकोरीबद्ध आयुष्याची सुरुवात होत असते असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी जोखीम पत्करून काम केले. या कालावधीत केलेले काम प्रत्येकासाठी संस्मरणीय असणार आहे. कर्मचा-यांच्या सांघिक योगदानामुळे कोणतीही जबाबदारी योग्य रितीने पार पाडता येते हे या कामातून दिसून आले. सेवानिवृत्ती नंतर कर्मचा-यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच सामाजिक कार्य़ात सक्रीय रहावे असेही महापौर यावेळी म्हणाल्या.

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनीही शुभेच्छापर मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button