breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

कोल्हापूरचा तांबडा-पांढरा महाग, मटन दरवाढी विरोध आंदोलनामुळे प्रशासनाने नेमली प्रशासकीय समिती

कोल्हापूर – कोल्हापूर म्हटलं की, पॅर्टनच वेगळा आहे. सतत नवनवीन शक्कलं लढवून आंदोलने करण्यात येतात. आता कोल्हापूरचा तांबडा-पांढरा महाग होवू लागल्याने लोकांनी मटण दरवाढी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यावरुन मटन थेट नदी पलीकडून आणण्याचा बोर्ड झळकावला अन्ं संघर्षाला सुरुवात झाली.

कोल्हापुरात मटण दरावर तोडगा काढण्यासाठी अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आहे. महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने ७ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे.

कोल्हापूरात गेल्याकाही दिवसांपासून मटणाचे दर वाढले आहे. मटण म्हणजे कोल्हापूरकरांचा आवडता पदार्थ. तोच महाग झाल्यामुळे कोल्हापूरकर हैरान झाले होते. मात्र, कोणतेही हिंसक आंदोलक न करता बावडेकरांनी मटणाचे दर कमी केले आहेत. काही कोल्हापूकरांनी बोर्ड लावून तर काहींनी कमी दरात मटण विक्री सुरू केली.

सुरूवातीचा मटण विक्रेत्यांकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आहे. पण कोल्हापूकरांनी एकदा ठरवलं तर ते मिळेपर्यंत शातं बसतील ते कोल्हापूरकर कसले. अखेर विक्रेते आणि ग्रामस्तांनी मिळून तोडगा काढला आणि मटणाचे दर कमी केले. त्यामुळे आता बावडेकरांच्या आंदोलनाला यश मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button