breaking-newsमुंबई

…त्यापेक्षा आम्ही काँग्रेस आणि पवारांची भांडी घासतोय सांगा; राऊत, आदित्य यांना राणेंचा टोला

मुंबई | महाईन्यूज

दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत होते. मात्र या आंदोलनादरम्यान एका तरुणीनं हातात ‘फ्री काश्मीर’चं पोस्टर धरल्याने सध्या हा पोस्टर राजकीय चर्चेचा विषय बनलेला आहे, या फ्री पोस्टरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडिओ ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलेलं होतं आता मात्र फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा आहे. तसेच काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्याच्या निर्बंधांमधून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी पोस्टरद्वारे करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पोस्टर झळकवणाऱ्या मुलीचा उद्देश नेमका काय होता हे समजून घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलेलं होतं. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या फ्री काश्मीरच्या पोस्टरबद्दलच्या विधानावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधलेला आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘Free Kashmir’ चा अर्थ शिवसेनेच्या संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला ‘Free Internet’ वाटला. लोकांना मूर्ख समजता??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला Free Kashmir चा अर्थ कळतो असं म्हणत संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button