breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वैद्यकीय अधिका-यांचे स्वीय सहायक अजय चाैधरी यांची बदली ? ‘महा ई न्यूज’चा ‘इफेक्ट’

महिलांच्या गंभीर आरोपाकडे आयुक्तांचा कानाडोळा

पिंपरी –  महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांचे स्वीय सहायक अजय चाैधरी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात तेथील महिला कर्मचा-यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारी गंभीर दखल घेवून महापालिका तपासणी पथकाद्वारे चाैकशी करण्यात आली. तसेच त्यांची तेथून बदली करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेच्या वैद्यकीय  विभागातील आरोग्य वैद्यकीय अधिका-यांचा स्वीय सहायक अजय चाैधरी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्या स्वीय सहायका विरोधात महिलांना गंभीर आरोप करुन तक्रार करण्यात आल्या. तसेच कार्यालयीनही विविध अडीअडचणी लेखी तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. दरम्यान, सदरील तक्रार निनावी असल्याने प्रशासन विभागाने महिलांचा तक्रारी वगळून अन्य तक्रारीबाबत चाैकशी करण्यात आली.

याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले की, महिलांनी स्वताःहून पुढे येवून नावानिशी तक्रार द्यायला हवी, पंरतू, वैद्यकीय विभागातील महिला तक्रार देण्यास पुढे आलेल्या नाहीत. त्यामुळे निनावी तक्रार आम्ही दप्तरी दाखल केली आहे. मात्र, महापालिकेत महिलांच्या गंभीर तक्रारीची चाैकशी न होता त्या तक्रारी प्रशासन विभागाकडून दडपल्या जात आहेत.  त्यामुळे महापालिकेच्या तपासणी पथकाने स्वीय सहायक अजय चाैधरी यांच्या विरोधीतील तक्रारीची वैद्यकीय विभागात दोन दिवस कसून चाैकशी करण्यात आली. त्या चाैकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्या अहवालानूसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अजय चाैधरी यांची तत्काळ बदली करावी, तसेच त्यांच्यावर प्रशासनानूसार कडक कारवाई करुन सेवा पुस्तकात नोंद करावी, अशा सुचना प्रशासन विभागाला दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button