breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हरियाणात ८० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

रेवाडी – दिल्लीसह हरियाणामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. हरियाणाच्या रेवाडीमध्ये तब्बल ८० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शाळांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर उपायुक्त यशेंद्र सिंह यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कुमार यांना आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी सापडलेल्या शाळा पुढील 15 दिवस बंद ठेवण्याचे आणि शाळा सॅनिटाईज करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हरियाणा सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्यात 2 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वी काही सरकारी आणि खासगी शाळांमधील 837 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात रेवाडीमध्ये 5 सरकारी शाळा आणि 3 खासगी शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button