breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीजबिल माफीसाठी सलून व्यावसायिक राज्यभर आंदोलन करणार

पुणे – लोकांनी वीज वापरली त्याची बिले भरावीत. कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला आहे. तर उर्जामंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत नाभिक समाज नेते तथा सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सतत सहा महिने विविध मागण्यांसाठी व मदतीसाठी आंदोलन करून सलून व्यवसायिकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही, असा आरोप करत सोमवारपासून राज्यभर वीज बिलमाफी तसेच विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे सोमनाथ काशीद यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन काळात कवडीची मदत न करणाऱ्या शासनाने खोटी आणि भरमसाठ बिलं आमच्या माथी मारलीत, आम्ही ती भरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात दुकाने बंद असताना तसेच कित्येक घरे बंद असताना भरमसाठ लाईट बिलं आलीच कशी? असा संतप्त सवाल व्यावसायिक, सामान्य जनता विचारत आहे. घरे आणि दुकाने बंद असताना अव्वाच्या सव्वा लाईट बिल येणे म्हणजे मीटरमध्ये गडबड करून खूप मोठा भ्रष्टाचार होतोय की काय असा सवाल यानिमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत. महावितरण या कंपनीचा सध्याचा स्थिर आकार हा सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. सध्याचा स्थिर आकार म्हणजे पूर्वीचे महिन्यांचे लाईट बिल होते, असे सोमनाथ काशीद यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button